जळगाव जिल्ह्यात आज १५९ कोरोना बाधित रुग्ण, ५२१ रुग्ण बरे
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १५९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ४ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहर-९, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१२, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यातच्या आजच्या आकडेवारीनुसार आजवर जिल्ह्यात १ लाख ४० हजार ८९२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार २८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ४९ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.