भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

मोठा दिलासा;जळगाव जिल्ह्यात आज १५ रुग्ण कोरोना बाधित

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आजचे रुग्ण — जळगाव शहर – ०४, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०४, अमळनेर-०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण १५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४१ हजार ४१० पर्यंत पोहचली असून १ लाख ३९ हजार ५०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३३१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!