जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता वेग चिंताजनक; आज ३९६ बाधित !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सातत्याने वाढनारी संख्या चिंताजनक आहे. आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत चारशेच्या पल्यापर्यंत वाढ झाली आहे. आज दिवसभरात ३९६ कोरोना बाधीत आढळून आले असून आजच १२० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी–
जळगाव शहर-१४५, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३६, रावेर-५, यावल-१, अमळनेर-१२, चोपडा-६४, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-२, एरंडोल-१, जामनेर-२, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२ आणि इतर जिल्हे ६ असे एकुण ३९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ६१ हजार २७४ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ७७९ रूग्ण उपचार घेत आहे. आज २ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.