जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; आज ५४८ बाधित !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सातत्याने वाढनारी संख्या चिंताजनक असून आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत पाचशेच्या वर आकडा गाठला आहे. आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात ५४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आजच २४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे..
जिल्ह्यातील आजची आकडेवारी–
जळगाव शहर- २४८, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ-४६, रावेर-२४, यावल-०, अमळनेर-२, चोपडा-८३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-८, एरंडोल-३, जामनेर-४५, पारोळा-१७, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्हे २ असे एकुण ५४८ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा आतापर्यंत ६२ हजार ६५० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार ६४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यात आज जळगाव शहरातील ८२ वर्षीय आणि बोदवड तालुक्यातील ५१ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजवर १ हजार ३९६ रूग्णांचा मृत्यू झालाय.