भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; आज ११८३ नवीन संक्रमित !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११८३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२७४, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१४३, अमळनेर-८८, चोपडा-१९५, पाचोरा-१५, भडगाव-१०, धरणगाव-६९, यावल-३२, एरंडोल-१२२, जामनेर-४१, रावेर-३६, पारोळा-४८, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-४७, बोदवड-२१, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १ हजार १८३ बाधित आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आजवर ८१ हजार ९८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६९ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. १० हजार ४५४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज तब्बत १३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार ५३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!