भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आज १२२३ बाधितांचा नवीन उच्चांक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२२३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत.

दैनंदिन बाधित रुग्णांचे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम स्थापन होत आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना अचानक मृत्यूच्या संख्येने दोन अंकी आकडा गाठला आहे, आज १२२३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे.

जळगाव शहर-२४८, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-१३५, अमळनेर-१५३, चोपडा-३३८, पाचोरा-३, भडगाव-३०, धरणगाव-३१, यावल-४५, एरंडोल-२९, जामनेर-६५, रावेर-१९, पारोळा-३४, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-२९, बोदवड-२७ आणि इतर जिल्हा-१ असे एकुण १ हजार २२३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोरोनाच्या आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजवर एकुण ८० हजार ७८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६८ हजार ९८१ जण कोरानामुक्त झाली आहेत. तर १० हजार २७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यातून तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधित सहा रूग्ण जळगाव शहरातील आहे. आत्तापर्यंत १ हजार ५२६ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!