जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना; आजची ९८२ नविन बधितांची नोंद !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून जिल्ह्यात आज ९८२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३६३, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ- १९८, अमळनेर- १४, चोपडा-७४, पाचोरा-३०, भडगाव-०१, धरणगाव-०८, यावल-११, एरंडोल-०४, जामनेर-४०, रावेर-१८, पारोळा-४७, चाळीसगाव-१४२, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०६, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ९८२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६८ हजार ६६२ पर्यंत पोहचली असून ६० हजार ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६७१३ रुग्ण सध्या उपचार घेताय.