भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

JalgaonCoronaupdate। जिल्ह्यात आज ९३४ कोरोना संक्रमित; २० रुग्णाचा मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी दिवसाला येणाऱ्या बाधितांच्या तुलनेत आज दिवसभरातील संख्येत घट दिसत असली तरी मृतांचा आकडा वाढतांनाचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९३४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी– जळगाव शहर – २२०, जळगाव ग्रामीण-४३, भुसावळ- ४२, अमळनेर-२४, चोपडा-७३, पाचोरा-८, भडगाव-१२, धरणगाव-५८, यावल-३१, एरंडोल-७३, जामनेर-८४, रावेर-१०६, पारोळा-२६, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-४०, बोदवड-०८, इतर जिल्ह्यातील-११ असे एकुण ९३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०६ हजार ०७० पर्यंत पोहचली असून ९२ हजार ८७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज वीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८६८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११३२९ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!