भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ११७६ जणांना कोरोनाचा संसर्ग; १५ जण दगावले !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११७६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ३३३, जळगाव ग्रामीण-४१, भुसावळ- ४२, अमळनेर-३४, चोपडा-२६२, पाचोरा-४३, भडगाव-०८, धरणगाव-२८, यावल-८५, एरंडोल-४६, जामनेर-४८, रावेर-६१, पारोळा-३२, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-०३, बोदवड-४५, इतर जिल्ह्यातील-१० असे एकुण ११७६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ९५ हजार ९५८ पर्यंत पोहचली असून ८२ हजार ६०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १७१२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११६४६ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!