क्रेडीट कार्ड अॅक्टीवेशन बहाणा : ओटीपी घेवून ९९ हजारात ऑनलाईन फसवणूक !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : क्रेडीट कार्ड अॅक्टीव करुन देतो असे सांगुन ओटीपी घेवून त्याद्वारे ऑनलाईन खरेदी करून ९९ हजार ८६२ रुपयांची मुक्ताईनगर तालुक्यातील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. 03 जानेवारी 2021 व दि. 05 जानेवारी 2021 दरम्यान सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे संयुक्त बँकेचे क्रेडीट कार्ड बँकेने फिर्यादीचे घरी पोस्टाने पाठविले परंतु सदर क्रेडीटकार्ड मिळणेबाबत फिर्यादीने कोणत्याही बँकेच्या शाखेत अर्ज केलेला नव्हता व तोंडी मागणी केली नव्हती. तसेच कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाईल क्रमांकावरुन फिर्यादीचे वरनमुद मोबाइलवर फोन करुन तो बँकेतुन बोलत आहे व तुमचे क्रेडीट कार्ड अॅक्टीव करुन देतो असे सांगुन फिर्यादी कडुन ओटीपी घेवून त्याद्वारे वन प्लस स्टोर येथुन 91,895 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली आहे.
तसेच ग्रोफर इंडीया प्रा.लि. गुडगाव हरीयाणा येथुन 7,964 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली असुन असे एकुण 99,862 रुपये फिर्यादीचे परवानगी शिवाय त्यांचा विश्वास संपादन करुन कोणीतरी त्यांचे नमुद क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन खरेदी करुन फसवणूक केल्याची तक्रार मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील संजय श्रीराम पाटील (वय ५४) यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.