ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याची बतावणी : ८ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : भुसावळ येथील एका तरुणाला ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळून देण्याचे आमिष देत ८ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांमधे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता म्हणून नोकरीला असलेले देवेंद्र मोतीराम सिडाम (वय-३३) रा.भुसावळ शहरातील शिवदत्त नगर यांना २६ डिसेंबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान विविध अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क केला. त्या दरम्यान तुम्ही गोल्डबार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल अशी बतावणी समोरच्याकडून करण्यात आली यानंतर देवेंद्र सिडाम यांनी ८ लाख ८५ हजार रुपये त्यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली.
यानंतर संबंधित अनोळखीं इसमाने फोनवरुन बोलतांना गुंतवणुकीवर २५ लाख रुपयांचा नफा झाल्याचा असल्याचे सिडाम यांना सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात आजपावेतो कुठल्याही नफ्याची रक्कम त्यांना मिळाली नाही. तसेच गुंतवणूक केलेले ८ लाख ८५ हजार रुपये न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्याने शनिवार, २ एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. पुढील तपास करीत आहेत.