इन्ट्राग्राम वरील मैत्रीतुन अत्त्याचाराचा व्हिडीओ बनवून पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहितेला ५० हजराची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। इन्टाग्रामवरील मैत्री एका विवाहितेला चांगलीच महागात पडलीय. इन्टाग्रामवरील मित्राने हॉटेलमध्ये नेत आधी अत्याचाराचा व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर व्हिडीओ पतीला दाखविण्याची धमकी देत मागितली ५० हजाराची मागणी केली. शेवटी पिडीत महिलेने पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश चौधरी (वय-४८ रा. जळगाव) विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय विवाहितेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. इन्ट्राग्रामवरून पिडीत विवाहितेची संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी ,वय-४८ रा. जळगाव याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर गणेश चौधरी याने मैत्रीच्या आड फेशीयल करण्याच्या बहाण्याने विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. याठिकाणी त्याने पिडीत विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांने अत्याचाराचा व्हिडीओ बनवित विवाहितेकडे ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर हा व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली. विवाहितेने नकार देत समजावण्याचा प्रयत्न केल्यावर गणेश चौधरीने पिडीतेला मारहाण केली. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपीने पिडीतेसह तिच्या पतिकडूनही फेसबुकवरून पैशांची मागणी केली. शेवटी विवाहितेने रामानंद नगर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहे.