जळगावधरणगाव

भुसावळच्या एका हॉटेलमध्ये मंगळसूत्र गळ्यात घालून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। धरणगाव तालुक्यातील एका गावातील उच्च शिक्षित मुलीवर गावातीलच मुलाने प्रेम संबंध निर्माण करून भुसावळच्या एका हॉटेलमध्ये मंगळसूत्र गळ्यात घालून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आर्मीत जम्मू-काश्मीर येथे कार्यरत असलेल्या जवानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश संजय काळे असं संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पिडीत तरुणीसोबत त्याचे मागील चार वर्षापासून प्रेम संबंध होते.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एकाच गावातील असल्यामुळे पिडीत तरुणी आणि संशयित आरोपी आकाश संजय काळे यांच्यात मागील पाच वर्षापासून प्रेम संबंध निर्माण झाले होते. दोघांचे एकमेकावर प्रेम होते. दोघांचे साधारण मागील चार वर्षापासून फोनवर बोलणे तसेच व्हाटसअपवर चॅटिंग सुरु होती. पिडीत तरुणी उच्च शिक्षित असल्याने ती एमपीएसीची (MPSC) तयारी करत आहे. दुसरीकडे संशयित आरोपी आकाश काळे हा देखील मागील पाच वर्षापासून आर्मीमध्ये जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत आहे. दरम्यान,दि. २५ फेब्रुवारी रोजी आकाश काळे येन पीडित तरुणीला फोन करून सांगितले की, तुझा MPSC चा पेपर २६ फेब्रुवारीला जळगाव येथे आहे. त्यामुळे तू लवकर ये मी सुध्दा रजा घेवुन येतोय. पिडीत तरुणी पेपर देण्यासाठी जळगाव येथे गेले होती. पेपर झाल्यावर आकाश काळे याने पिडीतेला जळगाव रेल्वे स्थानकावरून रेल्वेने भुसावळ येथे घेऊन गेला. तेथे त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.

आकाशने पिडीतेला चांदीची अंगठी, घड्याळ, कपडे आदी खरेदी करून सांगीतले की, मी तुझ्यासाठी जम्मू-काश्मीर येथून मंगळसुत्र, पर्स आदी साहीत्य आणले आहे आणि ते सर्व हॉटेलमध्ये ठेवलेय. हॉटेलमध्ये गेल्यावर आकाशने पिडीतेच्या हातात अंगठी घातली. एवढेच नव्हे तर गळ्यात मंगळसुत्र बाधुन फोटो काढले आणि लग्नाचे आमिष दाखवून पीडीतेवर रात्रभर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे अवघ्या दोन दिवसांनी संशयित आरोपी आकाशने पिडीतेला फोन करुन सांगीतले की, माझे लग्न दि. ५ मार्च रोजी रोजी चाळीसगाव येथील मुलीशी होणार असून तू आता मला फोन करायचा नाही. अगदी लग्नास त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पिडीतेला जबर धक्का बसला. शेवटी पिडीतेने धरणगाव पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. दरम्यान, गुन्हा भुसावळ शहरात घडला असल्यामुळे शून्य क्रमाकाने तो भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आहे. संशयित आरोपी आकाश काळेविरुद्ध भादवि कलम ३७६, ४२०, ४१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!