लागा तयारीला : जिल्ह्यातील ९ नगरपालिकाची निवडणुक ऑगस्ट महिन्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील ९२ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने जिल्ह्यातील ९ नगरपालिका रणधुमाळी यामुळे सुरू झाली असून या निवडणूकीच्या प्रक्रियेला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
- दोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका, पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्षांनी केले स्पष्ट
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, दिवाळीत वाजणार निवडणुकांचा बिगुल?
- राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी : अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा
जिल्ह्यातील १५ नगरपालिकांवर प्रशासक आहेत. यातील निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अ वर्गातील भुसावळ, ब वर्गातील अमळनेर व चाळीसगाव, तर क वर्गातील वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, यावल, फैजपूर या अशा एकूण ९ नगरपालिकांची निवणूक १८ ऑगस्ट ला होणार असून १९ तारखेला निकाल असणार आहे. तर जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांचे मतदान पुढील टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी २२ ते २८ जुलै २०२२ च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र म्हणजेच या तारखेत उमेदवारांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. यानंतर २९ रोजी उमेदवारी अर्ज छाननी होऊन ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम तारिख आहे. दिनांक १८ रोजी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
नगरपालिका निवडणुका हा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या कस घेणार्या ठरतील. यात प्रामुख्याने माजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची ताकद या निवडणुकीत पणास लागणार आहे. यात प्रत्येक नेत्याला आपापले बालेकिल्ले राखत आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.