भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधरणगाव

जळगाव जिल्हा हादरला! गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा, नराधम शिक्षकाचा जिल्हा परिषद शाळेतच चिमुकलीवर अत्याचार!

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे! एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर ज्याच्यावर मुलांच्या भविष्याची जबाबदारी होती त्याच एका नराधम शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे. रा. जळगाव या शिक्षकाविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे. याने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. इयत्ता चौथीमध्ये शिकणारी १० वर्षांच्या चिमुरडी वर अत्याचार केला. आरोपी शिक्षक पीडित मुलीला शाळा भरण्यापूर्वी सकाळी १० वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घ्यायचा. शाळा रिकामी असल्याचा गैरफायदा घेऊन तो गेल्या दोन वर्षांपासून तिला मोबाईलवर अश्लील चित्र दाखवत सातत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तिला मारहाण करत कोणाला सांगितल्यास आई वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत होता.

शाळा सुटल्या नंतर मुलगी तिच्या नातेवाईकांकडे गेली असता तिथे तिची तब्बेत बिघडली. त्या नंतर तिने खाणे पिणे बंद केले. त्या वेळी नातेवाईकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता हा धक्कादायक घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण धरणगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्ह्याचे स्वरूप पाहता धरणगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक नंदलाल मराठे रा. जळगाव. याच्या विरुद्ध पोक्सो (POCSO) आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये यापूर्वीही शिक्षकाकडून विद्यार्थिनीच्या शोषणाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, विद्येच्या मंदिरातच अशा घटना वारंवार घडत असल्याने शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरणगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि BNS च्या अत्यंत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार करणाऱ्या या नराधमाने चिमुकलीला “जीवे मारण्याची” धमकी देऊन दहशतीखाली ठेवले होते.


अवघ्या काही दिवसांपूर्वीच अशाच एका घटनेने धरणगाव हादरले असताना, पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधम शिक्षकाला समाजात स्थान नाही! त्याला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीच मिळायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणाही नराधमाची असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!