जळगाव जिल्ह्यात ७ वर्षाच्या मुलावर १४ वर्षाच्या मुलाने केला अनैसर्गिक अत्याचार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पाचोरा तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे
या बाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात १५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका शेतात १४ वर्षीय मुलाने गावातीलच पहिलीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. या संदर्भात पिडीत बालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून १४ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि महेद्र वाघमारे हे करीत आहे.