भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

सहा वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार,जळगाव जिल्ह्यातील घटना

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। भडगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. खेळत असलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला घरात बोलून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील एका गावात राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील संशयित आरोपी विकास सिताराम पाटील याने गोड बोलून मुलगी खेळत असताना घरात बोलून, ‘मी पैसे देतो कुणाला काहीही सांगू नको’, असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या संदर्भात पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितले. नातेवाइकांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विकास सिताराम पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!