बिग ब्रेकिंग | पाटबंधारे विभागातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात !
चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | पाटबंधारे विभागातील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून दरम्यान सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
त्यानुसार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.