श्री राम मंदिराच्या पुजार्यांबाबत सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट; सावदा येथे गुन्हा दाखल
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | अयोध्येतील श्रीराम मंदिर येथील नवनियुक्त झालेले पुजारी मोहित पांडे यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करून ती व्हायरल केल्या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रावेर तालुक्यात खळबळ! महिला सरपंच अपात्र
- नायगावात दुर्गा देवीचे विसर्जन उत्साहात साजरे
- दांडियातील वाद मिटवणे पडले महागात! दसऱ्याच्या रात्री जळगावात रक्तरंजित थरार; चॉपर हल्ल्यात एक ठार, दुसरा गंभीर जखमी
- शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रसिद्ध! २ ते १४ नोव्हेंबर दरम्यान सुट्टी; १६ नोव्हेंबर पासून दुसरे सत्र सुरू
- मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू! भुसावळसह “या ” स्थानकांवर थांबा ! मुंबई ते अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक फेऱ्या
यावल तालुक्यातील कोळवद येथील रहिवासी असलेले अभय महाजन याने सोशल मीडियात अयोध्या येथील नियोजीत श्रीराम मंदिराच्या प्रमुख पुजारीपदी अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले पुजारी मोहित पांडे यांच्या विरोधात सोशल मीडियात त्यांचा फोटो मॉर्फ करून एक पोस्ट फेसबुकवरून शेअर केली.
या घटनेने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून सावदा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार, अभय महाजन रा. कोळवद, ता. यावल. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा व्यक्ती एका राजकीय पक्षाचा सोशल मीडिया पदाधिकारी असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदरील प्रकरणाचा तपास स पो नि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ विनोद खांडबहाले करीत आहेत.







