जळगावच्या उपमहापौरांवर गोळीबार करणाऱ्या प्रमुख आरोपींना अटक
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री घडली.या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली होती याच प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी महेंद्र राजपूत याला रात्री उशीरा अटक करण्यात आली .
जळगाव चे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीं पैकी किरण शरद राजपूत व उमेश पांडुरंग राजपूत या दोघांना पोलिसांनी सोमवारीच अटक केली. तर मंगळवारी रात्री गुन्ह्यात वापरलेल्या एम.एच.४८ एफ १४२२ या क्रमांकाच्या कारसह मुख्य आरोपी महेंद्र राजपूत याला रात्री ताब्यात घेतले असून गोळीबार प्रकरणातील त्या पैकी भूषण बिर्हाडे व जुगल बागुल हे सध्या फरार आहेत.महेंद्र राजपूत याला अटक करण्यात आल्यामुळे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरील हल्ल्यातील तपासाला गती मिळणार असून हल्ल्याचे कारणही समोर येईल .