यावल येथे गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजणाऱ्यास अटक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील सुंदर नगरीतील एक युवक गावठी कट्टा कमरेला लावून शहरातील बुरूज चौकात दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना यावल शहरातील बुरूज चौकात संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील (वय-२२) रा. सुंदर नगरी यावल हा तरूण बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती त्यानुसार पथक जळगावहून यावलला आज मंगळवारी २७ जुलै रोजी दाखल झाले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड, पोलीस कान्स्टेबर विनोद पाटील, रणजित जाधव यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील याला अटक केली. त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात पोलीस कान्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

