कोरोना पॉझिटिव्ह पतीला बेड मिळावा म्हणून पत्नी व मुलाचा आटापिटा !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील धरणगाव तालूक्यातील हिंगणे येथून आलेल्या एका महिलेची नवऱ्याला व मुलाची वडिलांना वाचवण्यासाठी सुरु असलेली धावपळ जिल्हा व स्थानिक प्रशासन संक्रमण काळात आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले आहे.
धरणगाव तालूक्यातील हिंगणे येथील प्रल्हाद सिताराम पाटील ,वय ४८ यांच्यावर गेल्या काही दिवसांपुर्वी टायफाइडच्या आजारावर गावातच उपचार सुरु होते. आजारपण वाढत असल्याने कुटूंबीयांनी त्यांना जळगावी आणले असता, मात्र शासकिय रुग्णालयासह कुठेच बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णवाहिका चालकाने त्यांना इकरा वैद्यकीय महाविद्यालयात आणले. कोव्हीड टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले. गेल्या चार दिवसांपासुन ते ऑक्सीजनवर असुन प्रकृती खालवत असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना व्हेंटीलेटर बेड असलेल्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
आजारी पतीसाठी व वडिलांसाठी वाट्टेल ते, करण्याची तयारी असलेल्या ज्योती पाटील व त्यांच्या मुलाने जळगाव शहरातील सर्वच खासगी रुग्णालयालये धुंडाळले. मात्र कुठेच व्हेंटीलेटर बेड त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर मिळवून त्यांना फोन लावुनही उपयोग होत नसुन हे कुटूंबीय आपल्या रुग्णासाठी धावपळ करत असल्याचे गंभीर चित्र आहे.
बेड मॅनेजमेंट कडूनही नकार
जिल्हा प्रशासन व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या बेड व्यवस्थापन समिती कार्यालयातही संपर्क केला असता त्यांनीही व्हेंटीलेटर बेड उपलब्ध नसल्याचे कळवले. पाटील कुटूंबीय व्हेंटीलेटर बेडसाठी शोधाशोध बगता परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते.
रुग्णाचा खच डॉक्टर मात्र एकच, डॉक्टर कडून रुग्णांची हकलपट्टी –
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत शिरसोली रेाडवरी इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात १०० रुग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र, दिड दोनशे रुग्णांची क्षमता असतांना प्रशासनाने डॉक्टर आणि स्टाफ उपलब्ध करुन न दिल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी केवळ १ डॉक्टर व दोन नर्सेस असा स्टाफ असल्याचे येथे कार्यरत एका डॉक्टरने रुग्ण नाकारतांना माहिती दिली आहे. प्रशासन स्टाफ देत नाही, शंभरच्या वर रुग्ण दाखल असून एक माणुस काय..काय, बघेल. खाटा खाली असल्या तरी आमच्या शरीराचीही क्षमता असल्याचा टाहेा येथील डॉक्टरने फोडला.