हतनूर धरणाचे २८ दरवाजे पूर्णपणे उघडले,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आला असल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने हतनूर धरणाचे २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. हतनूर धरण क्षेत्रातील सर्वत्र पाऊस झाल्याने तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून दर सेकंदाला धरणातून ३० हजार ४४२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्या मुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदी पत्रात गुरेढोरांना सोडू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.