Jalgaon| कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे तरुणीच्या जीवावर बेतले !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव jalgaon शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
- बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?
- सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी
- फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती 20 वर्षांची होती. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात कामाला होती. काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.
मृत्यूनंतर ही हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने त्यामुळेच तिला रेल्वेचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, स्नेहल उजेनकर या तरुणीचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.





