जाळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक राज
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जाळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने सर्व १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जरी केले.
गेल्या पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती सर्व पंचायत समिती सदस्य व सभपतींचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपल्याने
ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दि ११ मार्च रोजीच सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओं डॉ.पंकज आशिया याना काढल्याने त्यांनी सर्व १५ पंचायत समित्यांवर १५ गटविकास अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश काढून त्यांना १४ मार्च पासून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले.
प्रशासक असे—
भुसावळ -विलास भाटकर,
अमळनेर -येथे एकनाथ चौधरी,
बोदवड -एस.आर. नागटिळक, मुक्ताईनगर – एस.आर. नागटिळक
चोपडा – बी.एस. कोसोदे,
भडगावला – आर.ओ.वाघ,
जळगाव – एस.बी.सोनवणे,
एरंडोल – बी.एस.अकलाडे,
जामनेर – अतुल पाटील
चाळीसगाव – ए.डी.वाळेकर
यावल – मंजुश्री गायकवाड
पाचोरा – अतुल पाटील
रावेर – दीपाली कोतवाल,
पारोळा – व्ही.डी. लोंढे,
धरणगाव – स्नेहा कुडचे, या प्रमाणे प्रशासक नियुक्ती चे आदेश दिले.