भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

शनिवार,रविवारी देखील जि. प. व पं.स. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारणार

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। निवडणूक आयोगाने जळगाव जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचना तयार करून त्या वर हरकतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

त्याच अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी,जाळगाव यांच्याकडे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक २ ते ८ जून, २०२२ असल्यामुळे शनिवार दिनांक ४ जून, २०२२ व रविवार दिनांक ५ जून, २०२२ रोजी कार्यालयीन वेळे मध्ये नागरिकांकडून प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्याकरिता जाळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत शाखेमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (म.प्र.) शुभांगी भारदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!