रविवार ५ जून रोजी भरणारे आठवडे बाजार सोयीच्या दिवशी भरवावे– जिल्हाधिकारी
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रविवार ५ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ८ ग्रामपंचयाती मधील रिक्त सदस्य पदासाठी मतदान होणार असल्यामुळे ५ जून या दिवशीचे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरवावे असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.
- राज्यातील सर्व शाळांसाठी दप्तर धोरण लागू : सहावी ते आठवी साठी वर्षातून दहा दिवस ‘दप्तरमुक्त’
- रावेर तालुक्यातील २२ वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार
- किरकोळ वादातून चाकूहल्ला ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, जामनेर मध्ये खळबळ
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगा कडून जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीतील ११४ रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या पोटनिवडणूकी साठी नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया, आणि मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचा तपशील मतदान 5 जून,2022 या मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार भरणार असलेल्या गावांची / भागाची यादी खालील प्रमाणे नमुद करण्यात आली आहे.
तालुका / ग्रामपंचातीचे आणि गावाचे नाव – भसावळ – साकरी, चाळीसगाव- जामडी प्र ब, जामनेर- वडगांव बु., मुक्ताईनगर – कुऱ्हा, पाचोरा- खेडगाव, यावल- डांभुर्णी, राजोरे, हिंगोणा या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकान्वये कळविले आहे.





