सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, आणखी भाव उच्चांक गाठणार, आजचा सोन्याचा दर काय?
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कारण सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा GST सह 66,800 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर हे 67 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील दोन दिवसात जवळपास सोन्याच्या दरात अडीच हजारांची वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागले आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षेने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
सोन्याच्या दरात तब्बल 2800 रुपयांची गेल्या तीन दिवसात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे 66800 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. वाढत्या दरात सोने ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र जळगाव सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरु केल्यानं, सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या मागे तब्बल दोन हजार आठशे रुपयांची वाढ तीन दिवसात झाली आहे. सोन्याचे दर हे 64800 तर GST सह 66800 रुपयांच्या वर जाऊन पोहोचली आहे.
सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता
जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याच्या दरात तीन दिवसात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसापूर्वी सोन्याचे दर GST सह 64100 होते तेच सोन्याचे दर आज तब्बल 66800 इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. आजवरचे सोन्याचे दर हे सर्वाधिक उंचीवर असल्याचं सोने व्यावसायिकांनी सांगितलं आहे. आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढ होऊन 70000 हजार रुपयां पर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.सोन्याच्या या वाढत्या दरामुळं ग्राहकांचा फारसा प्रतिसाद सोने खरेदीसाठी नसल्याचे पाहायला मिळत आहे. घरात लग्नकार्य असल्यानं सोने खरेदी करणे गरजेचे असल्यानं काहीजण वाढत्या जरातही खरेदी करत आहेत. अचानक सोन्याच्या वाढत्या दरामुळं बजेट बिघडल्याची माहिती अनेक ग्राहकांनी दिली आहे.