भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावनगरपालिकाराजकीय

भुसावळ खडसे समर्थकांना धक्का : नगराध्यक्षसह नऊ नगरसेवक अपात्र

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेल्या भुसावळ नगर पालिकेची मुदत संपण्यापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना आज अपात्र ठरविण्यात आले असून माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे याचे हे नगरसेवक समर्थक असल्याने यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

२०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेले तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग १ – ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १ अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते ( २२ ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) यांनी १७ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नगरसेवक पदाचा किंवा पक्षाचा राजीनामा न देता पालिकेची मुदत संपण्यापूर्वी या नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिकेवर निकाल देत त्यांना अपात्र केले आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी, पालिकेची मुदत संपण्यापूर्वी १७ डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या प्रकरणी २९ डिसेंबरला भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह ९ जणांविरुध्द अपात्रता याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!