मोठी बातमी! जळगाव मध्ये दोन गटात राडा, नंतर तुफान दगडफेक, सहा जखमी
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जळगावमधून धक्कादायक घटना समोर आली असून धार्मिक स्थळाच्या बांधकामाला विरोध केल्यामुळे जळगावच्या सुप्रीम कॉलनी परिसरात दोन गटात तुफान राडा झाला त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.
काय घडलं नेमकं ?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या सुप्रीम कॉलनी परिसरात एका धार्मिकस्थळी बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला एका गटानं विरोध केल्यामुळे दोन गट आमने-सामने आले. जोरदार राडा झाला. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दोन्ही गटातील सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अचानक घटलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं