भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : लाच घेताना वायरमन एसीबीच्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महावितरण कंपनीच्या वायरमनला शेतातील ट्यूबवेल साठी थ्री फेज वीज कनेक्शन जोडण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगावच्या पथकाने रंगेहात पकडल्याने महावितरणच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की,चोपडा तालुक्यातील शेतकरी असलेल्या तक्रारदाराच्या पत्नीचे नावे असलेल्या दोनगाव शिवारातील शेतातील ट्यूबवेल करिता थ्री फेज वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. वायरमन अनिल शंकर राठोड,वय-२८ रा. लक्ष्मी नगर धानोरा ता चोपडा, यांनी वीज कनेक्शन जोडण्यासाठी तक्रारदाराला ४ हजाराची मागणी केली होती,शेवटी तळजोडी अंती ३ हजार रुपये देणे ठरले.

दरम्यान तक्रारदार शेतकऱ्याने जळगाव येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने आज ३ हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले असून या बाबत चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!