जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात आज सोमवार पासुन ढगाळ वातावरण राहणार असून पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी हाेऊन पुन्हा तापमान वाढू शकते.पूर्व किनारपट्टक्षवर धडकलेल्या वादळाने उत्तर महाराष्ट्रात ११ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस हाेऊ शकताे. कही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो.
गेल्या दोन दिवसापूर्वी किमान तापमान ८.५ अंशावर असल्याने रात्री प्रचंड गारठा हाेता. वाऱ्याचा वेग ताशी १२ ते १४ किमी असल्याने गारठा अधिक वाढला हाेता. रात्रीसह दिवसाचे तापमान ३१ अंशावरून घसरून २९ अंशांवर आले. सकाळी ११ वाजेपर्यंत व दुपारी चारनंतर वातावरणात गारठा वाढल्याचे जाणवले. वातावरण ढगाळ असल्याने किमान तापमानात काहीशी वाढ हाेवून थंडी कमी हाेऊ शकते. वाऱ्याचा वेग कमी असला तरी शनिवारी बाेचरी थंडी जाणवली.