मुख्यमंत्री शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांच्यात जळगाव मध्ये द्वार बंद खलबते !
जळगाव, मंडे टु मंडे न्युज चम्मू| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव मध्ये खाजगी कार्यक्रमा निमित्त जळगाव दौर्यावर आले असता त्यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सोबत दार बंद चर्चा केली असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर ही खलबत झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आले होते. आचासंहिता असल्याने विमानतळावर मान्यवरांसह प्रशासकीय अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी ना. गिरीश महाजन यांच्या सोबत द्वार बंद २५ मिनिट खलबत झाली असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर ही खलबत झाल्याची माहिती मिळत आहे.त्यांच्या सोबत मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यातील सद्याची राजकीय पटलावर मोठ्या खडामोडी घडणार असल्याची माहिती असून जिल्ह्यातील लोकसभेसाठी जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय उलथापालथी होऊ शकता असे तरंग राजकीय पटलावर उमटत असून काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.