मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर ग्राम सुरक्षा दलातर्फे पवित्र रमजान निमित्त किराणाचे किट वाटप

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर ग्रामसुरक्षा दल तर्फे पवित्र रमजान महिन्याचे अवचित साधून गरीब गरजू विदवा महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले सदर ग्राम सुरक्षा दलाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मोहिते साहेब पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर हे तर सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम. हकीम आर चौधरी. जिल्हा उपाध्यक्ष मनियार बिरादारी.अ. फ.भालेराव साहित्यिक. यांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 30 गरीब गरजू विधवा महिलांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.

त्यात हमीदाबी हमाल. नशीम बी अफजल. मेहरुन बी तुकडु शाहा. सायरा बी साबीर मनियार. कुरशीद बी शेख लुखमान. अबेदाबी शेख अजीज. रसिदाबी हसन शाह. लंगडी रसिदा बी. सहेनाज बी शेख बाबुलाल. सायमा बी शेख जाकीर. सुर्याबी जब्बार. आधी एकूण ३० गरजू महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित राजकुमार शिंदे साहेबांनी व मोहिते साहेबांनी पन रमजान ईद निमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. सदर या कार्यक्रमाचे. सूत्रसंचालन हकीम चौधरी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून. बुडन खा ठेकेदार. अजितदादा आयलेकर. हाफीस अमीन साहेब. अहमद ठेकेदार. हसन दादा. इस्माईल बाटली. अरमान मिस्तरी. आदी मान्यवर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची यशस्वी साठी दिनेश कदम हकीम चौधरी अ.फ. भालेराव. आदींनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!