आरोग्यजळगाव

Covid JN.1 Variant : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यंत्रणांना अलर्ट राहाण्याच्या सूचना

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नकोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ११ नव्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत, कोरोनाने आता पुन्हा देशासह राज्यात डोके वर काढले आहे. आता JN1 हा नवा व्हेरिएंट उदयास आला असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावेळी कोरोनाचा JN1 हा नवा व्हेरिएंट आढळून आला असून दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून सर्वच आरोग्य यंत्रणांना अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्या नुसार जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यंत्रणाना सुद्धा अलर्ट राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्रणा देखील अलर्ट कारण्यात आली आहे. या रुग्णासाठी GMC जीएमसीमध्ये १०० बेड व ५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांनंतर आवश्यकतेनुसार अधिक सुविधा वाढविण्यात येतील अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दरम्यान JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला असला तरी जळगाव जिल्ह्यात अजून तरी या व्हेरिएंटचा रुग्ण मिळून आलेला नाही तरीही काळजी म्हणून आरोग्य यंत्रणा अलर्टमोड आहेत.

त्या नुसार जळगाव जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी किट देखील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची उपलब्ध आहेत तसेच १०० बेड,५० व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आले असून लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध आहे.विलगीकरण बेड्स, आयसीयू बेइस, व्हेंटिलेटर बेड्सही तयार करण्यात आले आहे.

काळजी घ्या
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही.परंतु काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

JN.1 BA.2.86 शी संबंधित आहे जो Omicron चा वंशज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती. तज्ञांच्या मते, दोन्ही रूपे जवळजवळ समान आहेत. त्यांच्या स्पाइक प्रथिनांमध्ये फारच थोडा फरक आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा भाग आहे ज्यामुळे तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला चकित करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. म्हणजे संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.

JN.1 ची लक्षणे
कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे: ताप थकवा वाहती सर्दी घसा खवखवणे डोकेदुखी खोकला गर्दी काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

JN.1 या नव्या व्हेरिएंट बद्दल काय म्हणतं जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला ‘वैरिएंट ऑफ इंटरेस्ट’’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे जागतिक सार्वजनिक आरोग्याला फारसा धोका नाही, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, तो आता BA.2.86 च्या वंशाचा आहे जो ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा डेटा (GISAID) शी संबंधित आहे. तथापि, अलिकडच्या आठवड्यात अनेक देशांमध्ये JN.1 ची प्रकरणे समोर येत आहेत. त्याचा प्रसार जागतिक स्तरावर झपाट्याने वाढला आहे.

खबरदारीचे उपाय म्हणून
देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान, डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. JN.1 प्रकाराबाबतही अशीच सावधगिरीची पावले उचलावी लागतील. साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे दोन व्यक्तिमधील अंतर ठेवा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!