भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

निवासी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला

जळगाव , मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। नुकतीच गेल्या काही दिवसांपूर्वी एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतांना रात्री अवैध वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांनी लोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.त्यात उपजिल्हाधिकारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार, ६ रोजी रात्री ११ ते ११.३० विजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद जवळ असलेल्या तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर महेंद्रा शोरूमच्या जवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहन, क्र. एम एच २८, सी ६४२१ ने जात असताना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. व त्यांनी ते थांबवले ,यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्यांना अडवले थोड्याच वेळात त्या ठिकाणी ७ ते ८ जण आले व त्यांनी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार विजय बनसोडे यांचेवर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याने त्यात उपजिल्हाधिकारी सोपान कासार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी रात्रीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!