भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमजळगाव

बनावट RTPCR प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करा – डॉ. रामानंद

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी गुन्ह्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी प्रकरण चांगलेच गाजले आहे.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते यात जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस चौकशी करून अहवाल तयार केला. अहवाल शनिवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार सुरक्षारक्षक दुर्गे व डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखी मान्य केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. यात शिक्का व सही बनावट आढळले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी समिती नेमलेली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांची समिती नेमली आहे. या समितीने देखील सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन अधिष्ठाता यांनी नेमलेल्या समितीशी चर्चा केली.३८ लोकांचे जबाब या समितीने नोंदवल्यानंतर कारवाईची शिफारस केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!