क्राईमजळगावधरणगाव

सुगंधी सुपारीसह दीड लाखांचा गुटखा जप्त

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। धरणगाव शहरातील चोपडा रोडवर शनिवारी गुटख्याची गाडी पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली होती. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून साधारण दीड लाखांचा माल तर एक लाखाचे वाहन असा एकूण २ लाख ३१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .

चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले हे शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी येत असता याचवेळी क्रीडा संकुलजवळ एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विमल गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी यासह विविध पदार्थ आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी संतोष राजेंद्र चौधरी (रा. धरणी चौक, धरणगाव) या संशयितास ताब्यास घेतले.

संशयितास ताब्यात घेतल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. त्यात आणखी दोन-तीन पोते भरून माल आढळून आला त्यात विमल पान मसाला,तंबाखुचे पाकिटे,करमचंद पान मसाल्याचे पाकीट,सागर पान मसाल्याचे पाकीट,के.सी.१००० जाफरानी जर्दा,सेंटेड तंबाखुचे पाकीट,व्ही १ तंबाखुचे पाकिटे, व १,००,०००/- रु. किमतीची पांढऱ्या रंगाची मारोती ओमनी व्हॅन (क्रमांक एम.एच.१९ एल ८०४) असा एकूण २,३१,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संतोष राजेंद्र चौधरी (वय २६, धंदा- पान दुकान, रा. धरणी चौक मराठे गल्ली धरणगाव), सचीन धर्मसिंग बयास (वय २४, धंदा मजुरी, रा. बालाजी गल्ली धरणगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करित आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!