भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

एक हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बारावीच्या निकालाचे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टीफिकेटवर आईचे नाव दुरूस्ती करण्याच्या मोबदल्यात एक हजाराची लाच घेताना वडगाव येथील कविवर्य श्री.ना.धो. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक राजेंद्र भास्करराव पाटील याना जळगाव येथील लाचलुचपत विभागाने अटक केली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव ता.सोयगाव जि.औरंगाबाद येथुन सन-२०२१ मध्ये इयत्ता-१२ वी या वर्गाची परीक्षा तक्रारदाराचा मुलगा उत्तीर्ण झालेला होता. परंतु निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टीफिकेट वरती मुलाच्या आईचे नाव चुकीचे असल्याने सदर दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचे कडे मुख्याध्यापक राजेंद्र भास्करराव पाटील, वय-55 रा.भगवती हौसिंग सोसायटी,मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती

तक्रार दाराच्या तक्रारी नुसार अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP. शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,पो.ना.मनोज जोशी, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ,पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदिप पोळ यानी कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!