अनैतीक प्रेमसंबंध ठेवत बदनामीची भिती दाखवून आत्महत्येस प्रवृत्त केले
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील आदील उर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याने विवाहित महिलेशी अनैतीक प्रेमसंबंध ठेवून समाजात बदनामी करण्याची भिती दाखवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने शनिपेठ पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आदील उर्फ नट्टू अल्ताफ खाटीक,रा. जोशीपेठ, भावसार मढी जवळ, जळगाव.याने वेळोवेळी पीडितेशी अनैतीक प्रेमसंबंध ठेवून तिच्याशी व्हॉटसअप वर नेहमी चॅटींग सह मोबाईल बोलणे करायचा. नंतर पीडितेची समाजात बदनामी करण्याची भिती दाखवून वेळोवेळी आदील उर्फ नट्टु याने पिडीत विवाहितेकडे सतत पैशांची मागणी करत पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केले.या बाबत पीडित महिलेच्या पतीने शनीपेठ पोलिसस्टेशनला तक्रार दाखल केली आहे.


