भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासनराजकीय

लोकसभा निवडणूक २०२४ :दुसऱ्या दिवशी रावेर साठी १७ उमेदवारांनी ४६ अर्ज तर जळगाव साठी २५ उमेदवारांनी घेतले ६० अर्ज

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याचा आज दुसरा दिवस,
आर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले
तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले. परंतु दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

रावेर लोकसभा मतदार संघ
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले आहेत. यात..
संजय कुमार लक्ष्मण वानखेडे, भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सोशल) २ अर्ज, अनंत वसंत बागुल, जळगाव( अपक्ष)२ अर्ज, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, ( अपक्ष)४ अर्ज. प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील, रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी४ अर्ज, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर( अपक्ष)४ अर्ज, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा( अपक्ष)२ अर्ज, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा( अपक्ष)१ अर्ज, अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा( भूमी मुक्ती मोर्चा)४ अर्ज, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला ( अपक्ष) यांच्यासाठी २ अर्ज, हर्षल राजेंद्र जैन, नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी ४ अर्ज, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष )यांचेसाठी २ अर्ज, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी ) ३ अर्ज.
डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष ) २ अर्ज, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे, भुसावळ ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी २ अर्ज, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर( वंचित बहुजन आघाडी)२ अर्ज. शेख कुरबान शेख करीम, फैजपूर(एमआयएम) ४ अर्ज. युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी, रावेर ( अपक्ष) यांच्यासाठी २ अर्ज असे एकूण १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघ
अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ०३ जळगाव लोकसभा मतदार संघ
अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले. तर दुसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी रउप खान कादिर खान, मालेगाव यांनी आयुष्या सिद्धीका रऊफ खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) २ अर्ज, रौफ खान कादिर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) १ अर्ज, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी १ अर्ज, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर (प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी) ३ अर्ज, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव( अपक्ष)४ अर्ज, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव( अपक्ष) ३ अर्ज, राजेश हरी सपकाळे, मोहाडी (अपक्ष)१ अर्ज, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे) यांच्यासाठी ४ अर्ज. मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे ) यांच्यासाठी ४ अर्ज. अरुण रोहिदास जगताप.धुळपिंपरी तालुका पारोळा, ( अपक्ष) ४ अर्ज. युवराज प्रकाश बारी जळगाव( अपक्ष) २ अर्ज. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (भाजपा १अर्ज, व अपक्ष १अर्ज) निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा ( अपक्ष)१ अर्ज, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी सौ वैशाली निळकंठ पाटील ( अपक्ष) यांच्यासाठी १ अर्ज, जळगाव ( अपक्ष-१ अर्ज, बहुजन विकास आघाडी -१ अर्ज), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल. अपक्ष-१ अर्ज, वंचित बहुजन आघाडी-१ अर्ज , नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार, जळगाव ( अपक्ष) २ अर्ज, राहुल नारायण बनसोडे भुसावळ ( बहुजन समाज पार्टी) ४ अर्ज, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी(अपक्ष ) यांच्यासाठी २;अर्ज. डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव ( अपक्ष)२ अर्ज, ऍड. वासुदेव धोंडू वारे, कासोदा ( अपक्ष) २अर्ज. मुकेश मुलचंद कोळी, शिरसोली( अपक्ष) १ अर्ज, विजय बाबुलाल दानेज, जळगाव ( अपक्ष) ४ अर्ज, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव ( अपक्ष) यांच्यासाठी ४ अर्ज. मांगो पुंडलिक पगारे, भडगाव (बहुजन महा पार्टी) २ अर्ज. असे एकूण २५ उमेदवारांनी ६० नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!