महाराष्ट्रशैक्षणिक

“या” तारखेपासून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर, १५ जून पासून सुरू होणार शाळा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार २ मे पासून उन्हाळी सुटी सुरू होणार असून, राज्यातील शाळा १५ जून पासून तर विदर्भातील शाळा १ जुलै पासून सुरू होणार आहेत. या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुटी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत व त्यानुसार राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने उचित निर्णय घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

तर पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा ३० रोजी रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू कराव्यात असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!