लोकसभा निवडणुक : आज रावेर साठी ४ उमेदवारांनी ६ अर्ज, तर जळगाव साठी २ उमेदवारांनी ३ अर्ज दाखल
तर रावेर साठी ९ उमेदवारांनी २४,तर जळगाव साठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले
जळगांव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.२३ एप्रिल रोजी
रावेर लोकसभा मतदार संघ
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. एकनाथ नागो साळुंखे , (अपक्ष )कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष )जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी
७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले आहेत. त्यात युवराज देवसिंग बारेला, चोपडा( बहुजन समाज पार्टी) २ अर्ज, जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ, नांदुरा( अपक्ष) १ अर्ज, युनूस अब्दुल तळवी यावल यांनी ममता भिकारी तळवी यावल( अपक्ष)यांचेसाठी २ अर्ज , अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड ( अपक्ष)२ अर्ज, दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर(अपक्ष )४ अर्ज, दीपक पद्माकर भालेराव, रावेरयांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर ( अपक्ष) ४ अर्ज, अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ) यांच्यासाठी ४ अर्ज, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी )२ अर्ज, आनंद जनार्दन तेलंग, मलकापूरयांनी सौ. अनिता योगेंद्र कोलते,मलकापूर (बहुजन समाज पार्टी )२ अर्ज. असे एकूण ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघ
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने २ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केला.
दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून ०३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव( अपक्ष) १ अर्ज, रोहन गणेश सोनवणे(अपक्ष ) १अर्ज, राहुल शशी कुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठ,३ अर्ज, नंदू शामराव पाटील (अपक्ष )१अर्ज, महेश सुपडू महाजन, जळगांव ( अपक्ष)१ अर्ज, प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष ) १ अर्ज, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव, (अपक्ष ) १असे एकूण ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले आहेत.