महिलेला धमकी देत जबरजस्ती अत्याचार करत व्हिडीओ बनवला8
जाळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेवर जबरजस्ती अमानुष अत्याचार केल्याची मोठी घटना घडली.तसेच अत्याचार करत असतानाचा व्हिडिओ देखील बनविल्याची घटना समोर आली.
या संदर्भात मिळालेली माहिती आशी की, ५ जून रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ४० वर्षीय महिला घरी एकटी असताना आबा अंबादास कोळी रा. घोसला ता. सोयगाव जि.औरंगाबाद हा दुचाकीवर येवून तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो असे म्हटले याला महिलेने नकार दिल्याने शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिला जबरीने दुचाकीवर बसवून घेवून गेला. व त्यांच्या शेतातील झाडा खाली तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केला.तसेच या अत्याचाराचा व्हिडीओ देखील तयार केला आणि भिलावा फोडून, नको त्या ठिकाणी देखील लावल्याने पीडित महिलेने पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आबा अंबादास कोळी रा. घोसला ता. सोयगाव जि.औरंगाबाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.