लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर कार्यक्रमांसाठी सक्तीचे नवीन नियम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमां साठी आता 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहता येणार नाही असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
जळगाव जिल्हयातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आज जिल्हाधिकारी यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी या पुढील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर कोणत्याही कार्यक्रमात तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.असे सक्त आदेश देण्यात आले असून लग्न समारंभासाठी इतर कार्यक्रमासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. तर जास्त गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.परवानगी न घेता व ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येणार आहे.