विवाहित महिलेस लग्नाचे आमिष देत तीन वर्ष अत्याचार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील समता नगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर तीन वर्ष अत्याचार केल्याचा घटना उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी, जळगावातील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळच राहणाऱ्या राजेश भीमराव साळुंखे याच्या सोबत तिचे प्रेम संबंध जुळले त्यानंतर विवाहित महिलेस राजेश साळुंके याने लग्नाचे आमिष दिले, यासर्व प्रकाराची वाहिवाहितेच्या पतीला माहिती मिळाल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राजेश साळुंके याने एका मंदिरात विवाह केला त्यानंतर विवाहितेला त्याच्यामुळे एक अपत्य देखील झाले.
काही दिवस दोघे मालेगाव येथे राहिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ त्याला घेऊन जळगावी निघून आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते तो विवाहितेसोबत राहत नव्हता. एकदा राजेशने विवाहितेला हॉटेलमध्ये घेऊन जात जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. राजेश आपल्यासोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने राजेश साळुंके यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.