तरुणीचा विनयभंग ; गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक
जळगाव,मंडे टू मंडे न्युज, वृत्तसेवा। १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील शब्द वापरून विनयभंग केल्याची घटना जळगाव jalgaon शहरात घडली असून या बाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,शहरातील महाविद्यालयीन तरुणी सोबत गेल्या चार माहीन्यांपासून देवेंद्र भागवत पाटील ,वय २१, नायगांव ता. यावल, अजय मनोज माळी,वय २०, तळेगांव,ता. जामनेर, कमलेश भटू भामरे ,वय १९ रा. सुराय ता. शिंदखेडा जिल्हा धुळे, अभिषेक रमेश बाविस्कर,वय १९, रा. फर्दापूर ता. सोयगाव, यांनी वेळोवेळी अश्लील संवाद साधून उघडपणे लैगींक सुखाची मागणी केली.मुलीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू! भुसावळसह “या ” स्थानकांवर थांबा ! मुंबई ते अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक फेऱ्या
- गावठी कट्टा व चार काडतुसांसह सुरत मधील सराईत गुन्हेगाराला अटक; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
- शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला वेग ; शाळांच्या १५ वर्षांतील तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ! जळगाव जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश





