ईडीच्या कारवाईने बहुचर्चित सीडी पुन्हा चर्चेत !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव/मुक्ताईनगर, प्रतिनिधी : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे ईडी च्या कारवाईने आता बहुचर्चित सीडी चर्चेत आली आहे.
भोसरी भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याने खडसे यांच्या भोवती ईडीचा फास आवळण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून राज्यातील वेगवान घडणाऱ्या घडामोडीनी कठोर कारवाई होण्याचे संकेत बहुदा खडसे यांना मिळाले असावे म्हणूनच काय गेल्या तीन दिवसांपासून ते मुंबईतच ठाण मांडून आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशापासून सीडीचा मुद्दा गाजत आहे. राज्यातील एका बड्या नेत्याच्या संदर्भात असलेली सीडी वेळ आल्यावर बाहेर काढून असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून करण्यात आले होते. आजपर्यंत या सीडीच्या केवळ चर्चाच असल्या तरी प्रत्यक्षात सीडी मात्र बाहेर आली नाही. ईडीची चौकशी लागली असून आता सीडी केव्हा लागणार याबाबत नागरिकांना देखील सीडीची उत्सुकता लागून आहे.
भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. भूखंड खरेदी प्रकरणात आरोपानंतर पक्षाने खडसेंना विचारणा केली आणि त्यानंतर खडसे यांनी राजीनामा दिला. चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. झोटींग समितीने आपला अहवाल सादर केला. अहवाल जाहीरपणे मांडण्यात आला नसला तरी खडसेंना त्यात क्लीनचिट मिळाल्याचे सांगण्यात आले. मुळात सर्व प्रकरण शांत झाले असे दिसत असतांनाच आता ईडी ने खडसे कुटुंबियांन भोवती फास आवळ्याचे दिसते म्हणून ईडीच्या कारवाईने बहुचर्चित सीडी पुन्हा चर्चेत आली आहे.