जळगाव शहरात पुन्हा खून! दोन दिवसात दुसरी घटना
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात खून झाला ही घटना ताजी असतानाच जळगाव शहर पुन्हा हादरलं असून काल मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भावेश उत्तम पाटील (वय २८, मुळ रा. आव्हाणे, जळगाव) या वाळू व्यावसायिक असलेल्या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.
जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहात असलेल्या भावेश पाटील या तरुणाचा भोसकून खून झाल्याची घटना घडली. खून कोणी व का ? केला, त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शहरातील निवृत्ती नगरात राहणारा भावेश हा वाळू व्यवसायिक असल्याची माहिती आहे.त्याचे वडील आव्हाणे गावात राहतात तर भाऊ कपील हा सुरत येथे वास्तव्यास आहे. पत्नी व मुलीसह तो निवृत्ती नगरात राहत होता. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरात घडलेली खुनाची घटना ताजी असताना जळगाव शहरात पुन्हा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.