जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, मुंबईत होणार भाजप मध्ये प्रवेश
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकम्प होणार असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते,अनेक दिवसांपासून जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयदादा गरुड व विलास राजपूत हे आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते याच्या सोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज दिनांक ३० रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा प्रवेश करणार आहेत. संजय गरुड यांच्या प्रवेशाने जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठं खिंडार पडल्याने जामनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
संजयदादा हे दोन दिवसांपासून मुंबईत आलेले आहेत. तर त्यांचे समर्थक हे काल रात्रीपासून मुंबईकडे निघाले आहेत.आज दुपारी पहिल्या टप्प्यात आजी-माजी जि.प./पंचायत समिती सदस्य, आजी/माजी सरपंच, विकासो चेअरमन/पदाधिकारी आदी तब्बल ३०० महत्वाचे पदाधिकारी हे संजयदादा गरूड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर सोबतीला सुमारे दोन हजार कार्यकर्ते हे देखील भारतीय जनता पक्षा दाखल होणार आहेत. या स्वागत सोहळ्याची अतिशय जंगी तयारी करण्यात आली आहे. काल रात्रीपासून लक्झरी, क्रूझर, खासगी चारचाकी वाहने असा तब्बल दीडशे वाहनांचा ताफा मुंबईत दाखल झालेला आहे.
जामनेर विधानसभा निवडणूकीत मंत्री यांच्या समोर आव्हान उभं करणारे पारंपरिक राजकीय विरोधक असणारे संजयदादा गरुड आज भाजपात प्रवेश करणार असल्याने दोन नेत्यांमधील पारंपरिक राजकीय वैर देखील मिटणार आहे.आज संजय गरुड भाजपा पक्ष प्रवेश करतील यावेळी त्यांच्या सोबत जवळपास पाचशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याने जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जामनेर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मुबंईत दाखल झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.